राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवुन तब्बल ९० चा स्ट्राईक रेट राखणारा भारतीय जनता पक्ष आता राज्यात लवकरच भाकरी फिरवणार असून प्रदेशाध्यक्ष बदलणार आहे.. चंद्रशेखर बावनकुळे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर त्यांच्या जागी प्रदेशाध्यक्षपदी कोणाची नेमणूक होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. आता राजकीय हालचालींना वेग आला असून भाजप प्रदेशाध्यक्षपदी नवा चेहरा मार्च महिन्यात निवडणार असल्याची माहिती समोर आली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडी आधी मात्र बूथ प्रमुख यांच्यासह तालुकाप्रमुख व जिल्हाप्रमुखांच्या निवडी होणार आहेत..दरम्यान मध्यप्रदेश लागलेले चंद्रशेखर बावनकुळे यांनीच माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांची भाजप संघटन पर्वचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्याची घोषणा केली आहे.
रविंद्र चव्हाण गेल्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते. मात्र यंदा त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला. तेव्हापासूनच त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद देण्यात येईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यानंतर आता रविंद्र चव्हाण यांच्याकडे विशेष जबाबदारी देण्यात आलेली आहे. प्रदेशाध्यक्षांना असलेले अधिकार आता चव्हाण यांच्याकडे राहणार आहेत. त्यामुळेच तेच पुढील प्रदेशाध्यक्ष असतील, ही बाब स्पष्ट आहे.