राजमुद्रा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळात डच्चू मिळालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंत्रीपद न मिळाल्याने उघडपणे नाराजी व्यक्त केली.. त्यानंतर ते काय निर्णय घेणार याकडे सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं असतानाच आता राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी त्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. “छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या नावाने पक्ष काढावा”, असे महादेव जानकर यांनी म्हटले आहे. त्यावर आता छगन भुजबळांनीही ठीक आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. आता भुजबळांच्या निर्णयाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत..
दरम्यान दुसरीकडे पुण्यातील होणाऱ्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि छगन भुजबळ हे एकत्र येणार आहेत.. यावेळी ते शरद पवारांच्या समोर काय भूमिका मांडणार हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.अशातच आता महादेव जानकर यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे.. छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या नावाने न पक्ष काढावा, आम्ही तुमच्यासोबत युती करू असंही त्यांनी म्हटल आहे.. त्यांच्या या सल्ल्याने त्यांनी एका मदतीचा हात पुढे केला आहे.. आता यावर छगन भुजबळ खरोखरच हा सल्ला अमलात आणणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..
छगन भुजबळ यांनी जर हा निर्णय घेतला तर चांगलं होईल. आज सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीदिवशी त्यांनी ते करावं. त्यांनी तो निर्णय घेतला तर चांगलं होईल. आताच नाही पुढच्या पिढीचंही भलं होईल”, असे महादेव जानकर म्हणाले.दरम्यान राष्ट्रीय समाज पक्ष हा दिल्ली आणि बिहारमध्ये निवडणूक लढवणार आहे. आम्ही आता एनडीएतून बाहेर आहोत”, असेही महादेव जानकरांनी म्हटल आहे..