राजमुद्रा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर खाते वाटपाचा प्रश्न संपुष्टात आला.. त्यानंतर आता गेल्या काही दिवसापासून महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू होती.. महायुती मधील तिन्ही पक्षांनी काही जिल्ह्यावर दावे केले होते तर काही जिल्ह्यांवर दोन पक्षांमध्ये चढाओढ लागली होती.आता मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी त्यावर तोडगा काढला आहे.नुकतीच पालकमंत्री पदाची संभाव्य यादी समोर आली आहे.
पालकमंत्र्यांची संभाव्य यादी –
गडचिरोली – देवेंद्र फडणवीस
नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
सातारा – शिवेंद्रराजे भोसले
अहमदनगर – राधाकृष्ण विखे पाटील
अमरावती – चंद्रकांत पाटील
अकोला – आकाश फुंडकर
धुळे – जयकुमार रावल
लातूर – गिरीष महाजन
मुंबई उपनगर – मंगलप्रभात लोढा/ आशिष शेलार
नंदुरबार – अशोक वुईके
पालघर – गणेश नाईक
सिंधुदुर्ग- नितेश राणे
सोलापूर – जयकुमार गोरे
वर्धा – पंकज भोयर
ठाणे – एकनाथ शिंदे
छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाठ / अतुल सावे
जळगाव – गुलाबराव पाटील / भाजपाचा देखील दावा आहे
यवतमाळ – संजय राठोड
हिंगोली – आशिष जैस्वाल
मुंबई शहर – प्रताप सरनाईक
नाशिक – दादा भुसे / गिरीश महाजन यांचा देखील दावा
रायगड – भरत गोगावले / आदिती तटकरे यांचाही दावा कायम
रत्नागिरी – उदय सामंत
पुणे – अजित पवार
बीड – अजित पवार
कोल्हापूर – हसन मुश्रीफ
अकोला – माणिकराव कोकाटे/ आकाश फुंडकर यांचाही दावा आहे.
भंडारा – मकरंद पाटील
चंद्रपूर – नरहरी झिरवळ
दरम्यान या महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी बैठकीनंतर पालकमंत्र्यांची नावे निश्चित केली आहेत.. तसेच आगामी होणाऱ्या पालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती मधील पक्ष स्वबळावर लढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.. अशातच आता राज्यातील संभाव्य पालकमंत्र्यांची यादी आता समोर आली आहे..