राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीला गळती लागली आहे..याचा सर्वाधिक फटका हा ठाकरे गटाला बसला आहे.. पुणे आणि मुंबई सोबतच आता अहिल्यानगरमध्येही ठाकरे गटातील अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.. त्यामुळे ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे..शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल संध्याकाळी अहिल्यानगर महानगरपालिकेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.हा पक्षप्रवेश मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला.. त्यामुळे ठाकरे गटाला मोठे खिंडार पडलं..
या पक्षप्रवेशांमध्ये माजी नगरसेवक दीपक साहेबराव खैरे, माजी स्थायी समिती सभापती दत्ता बाबाराव जाधव, माजी नगरसेवक प्रशांत बाळू गायकवाड, महिला अंबिका बँकेच्या अध्यक्ष शोभना चव्हाण, माजी नगरसेवक आणि शहरप्रमुख दिलीप नानभाऊ सातपुते यांचा समावेश आहे. यावेळी शिवसेना सचिव आणि उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, पुण्यश्लोक अहिल्यानगरचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे आणि शहरप्रमुख अजित दळवी हेदेखील उपस्थित होते.
आगामी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याच्या राजकीय वर्तुळात बदलाचे वारे लागले आहे.. या अनुषंगाने आता अहिल्यानगर मध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.यामध्ये तीन माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. दरम्यान अहिल्यानगर शहरावर गेली पंचवीस वर्षे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची सत्ता होती.. गेली 25 वर्ष हिंदू धर्म रक्षक स्वर्गीय अनिल राठोड हे अहिल्यानगर शहराचे आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र कोरोना काळात झालेल्या त्यांच्या निधनानंतर अहिल्यानगर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये शिवसेनीकांचे एकमेकांमध्ये एकमत राहिले नाही आणि अनेक शिवसैनिक नाराज झाले.त्यातच शिवसेना पक्ष फुटल्यानंतर शिंदे गट शिवसेनेमध्ये माजी शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी नगरसेवक अनिल शिंदे,अनिल लोखंडे, सचिन जाधव यांनी प्रवेश केला होता.