राजमुद्रा : राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार सत्तेत येण्यात मोलाचा वाटा ठरलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे..या योजनेसाठी आता महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी नवीन निकष जाहीर केले आहेत.या योजनेच्या अर्जाचीं आता छाननी करण्यात येत आहे. धुळे जिल्ह्यातील एका लाभार्थी महिलेचे सरकारने सात हजार पाचशे रुपये परत घेतले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणी चिंतेत पडले आहेत. भिकूबाई खैरनार असे त्या महिलेचे नाव असून त्या धुळे जिल्ह्यातील नकाने येथील रहिवासी आहेत.
जुलै महिन्यातील अर्थसंकल्पात अजित पवार यांनी या योजमेची घोषणा केली. त्याअंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात आले. आत्तपर्यंत कोट्यावधी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून डिसेंबरचा हप्ताही काही दिवसांपूर्वीच जमा झाला होता. तर महायुतीचं सरकार पुन्हा आल्यास ही रक्कम 2100 करू अशी घोषणा नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केली होती. त्यामुळे लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.. अपात्र लाडक्या बहिणीची रक्कम पुन्हा सरकार जमा करण्यात येत आहे..
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे निकष डावलून ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा’ लाभ घेतलेल्यांवर आता कारवाई सुरू झाली असून त्याअंतर्गतच हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यामुळे अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा करण्यात आली. त्यानुसार, धुळे जिल्ह्यात एका लाभार्थी महिलेला मिळालेले 7500 रुपये सरकारच्या तिजोरीमध्ये पुन्हा जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात ही खळबळ उडाली आहे..