राजमुद्रा : महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आता चांगलीच चर्चेत आली आहे.. नुकतीच धुळ्यातील एका लाभार्थी महिलेचे पैसे सरकारजमा झाले असल्याची माहिती समोर आली होती..आता त्या घटनेत मोठा ट्विस्ट आला असून
याबाबत वेगळीच माहिती समोर आली आहे. शासनाने आपल्याकडून पैसे परत घेतलेले नाही तर आम्हीच चुकीचे कागदपत्र दिल्याने आम्हाला पैसे मिळाले आणि ती चूक झाल्याचे आमच्याच लक्षात आले. त्यामुळे आम्ही स्वत:हून ते पैसे परत केल्याचे त्या महिलेने सांगितलं आहे.
राज्यात महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर लाडकी बहीण योजनेसाठी दिलेल्या अर्जांचीं पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता..त्यानुसार विविध अर्जांची फेर तपासणी सुरू असून योजनेच निकष डावलून लाभ घेतला असल्याचा धुळे जिल्ह्यात समोर आलं . मिळालेल्या माहितीनुसार भिकुबाई खैरनार असे त्या महिलेचे नाव असून धुळे जिल्ह्यातील नकाने येथील त्या रहिवासी आहेत. त्यांनी या योजनेचा दुबार लाभ घेतला आणि ते उघड झाल्यावर शासनाने त्यांचे पैसे परत घेतले अशी बातमी सर्वत्र पाहायला मिळाली.मात्र त्यानंतर याबाबतची खरी माहिती समोर आली… स्वतः भिकुबाई खैरनार आणि त्यांचा मुलगा पुढे आले आणि त्यांनी सगळं खरं नसल्याचे सांगत नेमकं काय घडलं हे स्पष्टपणे सांगितलं.. यामध्ये त्यांच्या चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतःहून सरकारकडे पैसे जमा केला असल्याचही स्पष्ट सांगितलं.
याबाबत त्या म्हणाल्या, माझ्या मुलाचे चुकून आधार कार्ड दिल्याने त्या आधार कार्ड ला लिंक असलेल्या बँक अकाउंट मध्ये पैसे आले होते. त्यामुळे शासनाने टाकलेल्या साडेसात हजार रुपये त्याच्या मुलांच्या बँक खात्यात जमा झाले.. त्यांचा मुलगा पोस्टमन आहे. मुलांच्या बँक खात्यात लाडक्या बहिणीचे पैसे आल्याचे लक्षात आल्यानंतर भिकुबाई यांनी प्रशासनाकडे हे पैसे परत करण्यासाठी अर्ज केला.. जिल्हाधिकांनी या संपूर्ण प्रकाराची पडताळणी केल्यानंतर या महिलेकडून साडेसात हजार रुपये परत हे शासनाकडे जमा केले. अशी माहिती महिलेच्या मुलाने ही दिली..