राजमुद्रा : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुका पूर्वीच जनतेसाठी घोषणांचा सपाटा लावला आहे.. दिल्लीत आपच सरकार आल्यास सर्व चुकीची पाण्याची बिले माफ केली जातील अशी मोठी घोषणा केजरीवाल यांनी केली आहे..
आगामी होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असून आता आप एक्शन मोडवर आला आहे.. 2013 पासून दिल्लीचा राजकारणात सत्ता असणाऱ्या “आप “ने आता विजयाची हॅट्रिक ची तयारी केली आहे.त्यासाठी निवडणूकापूर्वीच अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या जनतेवर विविध योजनांचा भडीमार करत मोठ्या घोषणा केल्या आहेत. दिल्लीतील चुकीची पाण्याची बिले माफ केली जातील अशी घोषणा करताना तें पुढे म्हणाले, आम आदमी पक्षाचे सरकार पुन्हा आल्यावर ज्यांना चुकीची पाण्याची बिल आली आहेत त्यांना भरण्याची गरज नाही.. निवडणुकीनंतर त्यांची चुकीची बिले माफ केली जातील हे माझे सर्व जनतेला वचन आहे असं त्यांनी म्हटलं.मी तुरुंगात गेल्यापासून त्यांनी काय केलं ते मला माहित नाही असं म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला.. दिल्लीतील लोकांना लाखो रुपयांची पाण्याची बिले येऊ लागले आहेत. मात्र आमचं सरकार आल्यानंतर चुकीची बिलं माफ केली जातील.. हे माझं वचन आहे याची हमी मी देतो अशी घोषणा त्यांनी केली आहे..
दरम्यान आगामी होणाऱ्या दिल्लीतील विधानसभा निवडणुकीसाठी आप च्या रणनीतीचा सामना करण्यासाठी आता भाजपनेही जोरदार तयारी सुरू केली आहे.. या निवडणुकीत केजरीवाल यांचा पराभव करणे हे भाजपसाठी मोठं आव्हान असणार आहे.. सध्या आप दिल्लीतील जनतेसाठी सातत्याने मोठ्या घोषणा करत आहे..