राजमुद्रा : राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येण्यासाठी विधानसभा निवडणुका पूर्वीपासूनच महायुतीच्या नेत्यांकडून घोषणांचा सपाटा लावला जात होता.. अशातच आता सरकार स्थापन होण्यात मोलाचा वाटा ठरलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अधिक गेमचेंजर ठरली.. मात्र राज्याची आर्थिक तब्येत नाजूक असल्याचा दावा विरोधक वारंवार करत होते..हा त्यांचा दावा आता खरा ठरला असून भारताचे नियंत्रक आणि महालेखापालांच्या अहवालातून ते स्पष्ट झाले आहे..नुकताच कॅगने राज्य सरकारच्या आर्थिक धोरणाचा समाचार घेतला असून तिजोरीवर आर्थिक बोजा वाढल्या असल्याचे सांगितले आहे. तसेच राजकोषीय तूट दोन लाख कोटीवर गेल्याचं सांगत कॅगने राज्य सरकारच्या आर्थिक बेशिस्तिवर ताशेरे ओढले आहेत..
भारताचे नियंत्रक आणि महालेखापालाच्या आलेल्या या अहवालामूळ आता लोकांनुनय योजना आणि कल्याणकारी योजनांना कात्री लागणार आहे.. तर दुसरीकडे लाडकी बहीण योजनेला पण या आर्थिक बेशिस्तीचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.. या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर भार पडत असल्याचही म्हटलं आहे. राज्य सरकारच्या जमा खर्चात ताळमेळ नसल्याच कॅगन म्हटल आहे.. त्याचबरोबर त्यांच्या अहवालात राज्याच्या आर्थिक बेशिस्तीवर चिंता व्यक्त करण्यात आले आहे..
राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी निधीची तरतूद केल्याच म्हटले होते.. पण आता कॅगच्या अहवालात राजकोषीय तूट दोन लाख कोटीवर पोहोचल्याच उघड झाला आहे.. राज्य सरकारच्या योजनामुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण आल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.. त्यामुळे मी लाडक्या बहिणींची चिंता ही वाढणार आहे..