राजमुद्रा : बीड जिल्ह्यातील माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्य हादरलं आहे.. या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले आहेत.. आता या प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून आठ आरोपीनां पकडण्यात पोलिसांना यश आल आहे. दरम्यान कृष्णा आंधळे सध्या वॉन्टेड असून त्याचा शोध पोलीस करीत आहेत.या प्रकरणातील आरोपींना तीन वेगवेगळ्या पोलिसांच्या कोठडी ठेवण्यात आला आहे..
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे फरार झाले होते. तर आरोपींना संतोष देशमुख यांच्याविषयी माहिती देणारा सिद्धार्थ सोनवणे हा देखील फरार होता. या तीनही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली. दरम्यान तीन दिवसांपूर्वी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे त्रिकुट फुटलं. आपापसात संपर्क न झाल्याने सुदर्शन घुले आणि सुधीर यांनीही महाराष्ट्रात जायचं ठरवलं. कृष्णा आंधळेची वाट न बघता दोघेही पुण्याला आले..पुण्यात तें एका व्यक्तीला भेटणार होते.. त्यांच्याकडून पैसे घेणार होते.. मात्र त्यापूर्वी पोलिसांनी सापळा रचला.. त्या दोघांना ताब्यात घेतले.. मात्र कृष्णा आधळे पुण्यात आल्याने तो फरार होण्यात यशस्वी ठरला..
या प्रकरणातील महेश केदार,प्रतीक घुले,जयराम चाटे,विष्णू चाटे हे आरोपी गेवराई पोलीस ठाण्यात अटकेत आहे तर सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे याला माजलगाव पोलिसांना ठेवण्यात आला आहे.. खंडणीच्या गुन्ह्यातील वाल्मीक कराड याला बीड शहर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आला आहे..
या प्रकरणातील मास्टरमाईड वाल्मीक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा सीआयडी तपास करत आहे. त्यामुळं या सर्व प्रक्रियेत वाल्मीक कराड कितपत सामील आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.