(राजमुद्रा पुणे) पुणे येथील खेड तालुक्यातील मांडवगण फराटा या गावातील 24 जणांच्या जगताप कुटुंबातील चक्क 21 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यात 6 महिन्याच्या बाळापासून 80 वर्षांच्या वृद्ध आजोबांसकट 11 महिला आणि 13 पुरुषांचा समावेश आहे.
पुणे येथील मांडवगण फराटा गावातील जगताप कुटुंबात एकूण 24 सदस्य आहेत. घरातील सदस्य शेती व्यवसायावर आपला गुजराण करतात. घरातील एक सदस्य टरबूज विक्रीसाठी फिरस्तीवर असल्याने त्यांना सौम्य कोरोनाची लक्षणे आढळून आली. घरातील सर्व सदस्यांची तपासणी केली असता अशोक यांच्यासह घरातील 21 जण कोरोनाच्या कचाट्यात सापडल्याचे निदर्शनात आले.
प्रशासनाला याबाबत माहिती मिळताच संपूर्ण घर सील केले. यातील सहा वयोवृद्धांना लक्षणे दिसून आल्यामुळे स्थानिक कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उर्वरित पंधरा सदस्य घरीच उपचारासाठी गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहेत. घरातील बरेच सदस्य हे लक्षणे नसल्यामुळे कोरोना झाल्याचे समजू शकले नव्हते. मात्र तपासणी केल्यावर 21 जण पॉझिटिव्ह आढळून आले. सध्या घरातील सदस्यांची हळूहळू सुधारणा होत असून सर्वांची प्रवृत्ती प्रकृती स्थिर आहे.