राजमुद्रा : आगामी महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत.. ठाकरे गटाचे एका मागून एक मोहरे पक्षाला सोडचिट्टी देत आहेत.. काल कोकणचे नेते राजन साळवी आणि उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर वाद झाल्यानंतर आता ठाकरे गटाचा धुळ्यातील बडा नेता सोडचिट्टी देत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे.. ठाकरे गटाचे धुळे जिल्ह्याचे सह संपर्कप्रमुख हिलाल माळी यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.. त्यामुळे ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे..
धुळे जिल्ह्याचे सह संपर्कप्रमुख असणारे हिलाल माळी यांचे धुळे शहर आणि ग्रामीण मतदारसंघांमध्ये मोठं काम आहे. शिवसेनेच्या अनेक मोठ्या आंदोलनात त्यांनी सहभागही घेतला होता.. आता ते ठाण्याच्या दिशेने रवाना झाले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार आहेत.. त्यांच्या या प्रवेशाने धुळे ग्रामीण मध्ये शिंदे सेनेला मोठे बळ मिळणार आहे.. तर ठाकरे गटाला मोठं खिंडार पडणार आहे.
धुळे ग्रामीण मध्ये उमेदवारी अर्ज न मिळाल्याने हिलाल माळी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.. मात्र आता त्यांनी उद्धव ठाकरे यांना धक्का देत शिंदेंच्या सेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.. हिलाल माळी यांच्यासह जिल्हा परिषद पंचायती समिती सदस्य, माजी नगरसेवक, शहरातील विविध समितीवर असलेले कार्यकर्ते ठाकरे गटाला सोडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे..