राजमुद्रा : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळं राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. या प्रकरणी आता मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे. सत्ताधारी आमदारांसह विरोधकांनीही यावर आवाज उठवला आहे.. या हत्याप्रकरणी पूर्वीपासूनच पोलिसांच्या भूमिकेवर ही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते..आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही हल्लाबोल चढवला आहे..बीडमधील संपूर्ण पोलीस खाते बरखास्त करायला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली असून या ठिकाणी नव्याने नेमणुका व्हायला पाहिजे त्यानंतर तपास व्हायला पाहिजे, अशा पद्धतीने तपास करणं अवघड आहे, असे राऊत यांनी म्हटल आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड आणि इतर आरोपींचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप करत विरोधकांनी नैतिकतेच्या आधारावर त्यांचा राजीनामा मागितला आहे. यावर आता उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ही त्यावरून निशाणा साधला आहे. आका आजही मंत्रिमंडळात असल्याची टीका त्यांनी केली. दरम्यान या प्रकारणातील एकूण आठ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे..
दरम्यान लाडकी बहीण योजनेवरूनही ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणीचे मते घेतली मात्र आता काम झाल्यावर त्यांचे पैसे काढत आहे, तेव्हा तुम्हाला कळले नाही का पैसे देताना, असा सवाल राऊतांनी केला आहे.