राजमुद्रा : आगामी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे.. या सर्व घडामोडी दरम्यान आता भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी मोफत अन्नदानाबाबत केलेल्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटणार आहे.. शिर्डीतील साईबाबा संस्थानाकडून भक्तांना मोफत अन्नदान केले जातं.मात्र संपूर्ण देश येऊन जातो..महाराष्ट्रातील सगळे भिकारी शिर्डीत जमा होतात हे योग्य नाही असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने साई भक्तांच्या भावना दुखावल्या असून त्यामुळे आता नवा वाद पेटणार आहे.
कित्येक दिवसापासून साई संस्थानाच्या प्रसादलायत मोफत भोजनाचा महाप्रसाद दिला जात असतो..साई संस्थानाच्या हा भोजनालयातील मोफत जेवण बंद करावे अशी मागणी खासदार सुजय विखे पाटील यांनी साई संस्थान प्रशासनाकडे केली आहे.. जे पैसे अन्नदानात जातात ते आमच्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करावेत असं त्यांनी म्हटले आहे.
साई संस्थान प्रसादयात मोफत प्रसाद दिल्यामुळे काही लोक जेवण म्हणून घेतात आणि त्यांचा दुरुपयोग होतो.. त्यामुळे शिर्डीत गुन्हेगारी आणि भिक्षुकरुनची संख्या वाढत आहे असं त्यांनीही म्हटलं आहे.. त्यामुळे या भोजनाचे मोल असावं असंही त्यांनी म्हटलं.. आखा देश इतर येऊन फुकट जेवण करतोय..महाराष्ट्राचे सगळे भिकारी येथे गोळा झालेत हे योग्य नाही.. आम्हाला आंदोलनाची वेळ आली तरी चालेल आम्ही आंदोलन करू असं देखील शिर्डीतील एका कार्यक्रमातील भाषणात सुजय विखे पाटील यांनी म्हटलं आहे.. त्यांच्या या वक्तव्याने वाद निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे..