राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठ्या फरकाने विजय मिळवल्यानंतर राज्यातील राजकारणातील बदल सर्वांना जाणवत आहे.. या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्याने त्यांची आता इन्कमिंग पॉवर वाढली आहे. अशातच आता भाजप आणि ठाकरे गटात जवळीक वाढत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.. याला कारणीभूत ठरत आहे ते उद्धव ठाकरे यांच्या लाडक्या आमदारांच ट्विट. ठाकरेंचे लाडके आमदार मिलिंद नार्वेकर भाजप सोबत जवळीक वाढवताना दिसत आहेत.. देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी मुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या… यानंतर 28 नोव्हेंबरला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचं अभिनंदन केलं होतं. त्यांची ही भूमिका पाहता आता ठाकरे गट आणि भाजप आगामी काळात एकत्र येऊ शकतात अशा चर्चांना उद्याण आलं आहे.
याआधी नागपुरातील हिवाळी अधिवेशनावेळी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी वेळ काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अभिनंदन करत भेट घेतली होती.. त्यानंतर ही भाजप -सेना भविष्यात एकत्र येतील अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.. त्यानंतर पुन्हा एकदा आता ठाकरे गटाचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांची जवळी पाहता पुन्हा एकदा ठाकरे गट आणि भाजप एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारमध्ये एकेकाळी मंत्री असलेल्या आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी या चर्चेला दुजोरा दिला आहे.. आता ठाकरे गट आणि भाजप एकत्र येणारच का हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे..