राजमुद्रा : गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसनंतर आणखी एका विषाणूने चीनमध्ये एन्ट्री केली आहे..विषाणूचे नाव ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस म्हणजेच एचएमपीव्ही ( HMVP)असे आहे..या विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. महाराष्ट्रात आरोग्य विभागाला सतर्क घेण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले आहेत.. यावेळी अधिकाऱ्यांनाही टार्गेट करण्यात आले असून हे टार्गेट स्थानिक कार्यालयापर्यंत असल्यामुळे आता कर्मचाऱ्यांनाही कामे करावी लागणार आहेत.. या विषाणूच्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकार ही सतर्क झाला असून आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पार्श्वभूमीवर विभागाच्या वेबसाईट सुसज्ज करा आणि माहिती अधिकारात मागितली जाते ती सर्व माहिती त्यावर आधीच टाका असंही सांगितलं आहे.. त्यांनी
100 दिवसांत प्राधान्याने करावयाची कामे सांगितली. ही कामे विभागासोबत आता स्थानिक कार्यालयांना सुद्धा करावी लागणार आहे. स्थानिक कार्यालयांना 100 दिवसांचे टार्गेट दिले गेले आहे. त्यामुळे आता आरोग्य यंत्रणाला चांगलच काम करावे लागणार आहे.
या बैठकीवेळी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिसीद्वारे संवाद साधला. यावेळी अधिकाऱ्यांना टार्गेट दिले.
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या विषाणू ने झालेली लोकांचीं अवस्था पाहता आता या नव्या विषाणूच्या एंट्रीने सरकार अलर्ट मोडवर आला आहे.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात बैठक घेतली असून या बैठकीत अधिकाऱ्यांना टार्गेट केला आहे.
यावेळी त्यांनी कार्यालयाची साफसफाई करून कार्यालय स्वच्छ ठेवा तसेच त्या ठिकाणी पिण्याची स्वच्छ पाणी ठेवा.. वाहनांचे भंगार साफसफाई करा.. सार्वजनिक प्रसाधनगृह स्वच्छ राहतील हे सोने निश्चित करा.. अशा सूचना केल्या.