राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीला मोठी गळती लागली आहे. याचा सर्वाधिक फटका ठाकरे गटाला बसला आहे.. विधानसभेच्या पराभव नंतर ठाकरे गटाची ताकद कमी झाली असून अनेक मोहरे शिवबंधन सोडून इतर पक्षात प्रवेश करत आहेत.. अशातच आता पुण्यातील माजी नगरसेवकांनी शिवबंधन सोडत आता कमळ हाती घेतला आहे. त्यामुळे भाजपने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे.. या धक्का मुळे आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे गटांसमोर पक्ष एकसंध ठेवण्यास मोठे आव्हान असणार आहे..
पुण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे विशाल धनवडे, बाळा ओसवाल,प्राची आल्हाट, संगीता ठोसर आणि पल्लवी जावळे या माजी नगरसेवकांनी आज चंद्रशेखर बावनकुळे, मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. भाजपात पक्षप्रवेश करत असताना माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी पक्ष नेतृत्वासह स्थानिक नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाची ताकद कमी झाली असून भाजपची ताकद आता वाढली आहे.. आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच महापालिकेत आपली सत्ता मिळावी यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू असल्यासही बोलले जात आहे.
दरम्यान दुसरीकडे ठाकरेंच्या या पाच नगरसेवकांनी भाजपा प्रवेश केल्याने भाजपमधील अंतर्गत नाराजी वाढल्याचं बोलले जात आहे. त्यामुळे या पक्षप्रवेशामुळे भाजपला महापालिका निवडणुकीत फायदा होणार की फटका बसणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
पुणे शहरात ठाकरे गटाचे एकूण 10 नगरसेवक होते, दोन गट पडल्यानंतर नगरसेवक नाना भानगिरे हे शिंदे गटात गेले आणि आता पाच नगरसेवक भाजपात गेल्यामुळे केवळ चार नगरसेवक ठाकरे गटासोबत आहेत, यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.