राजमुद्रा : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.. या प्रकरणाचा संबंध मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी जोडला जात असून या हत्येचा मुख्य मास्टरमाईड वाल्मीक कराड हा त्यांचा निकटवर्ती असल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशा मागण्या होत आहेत.. अशातच आता त्यांच्या अडचणी वाढणार असून बीड जिल्ह्यातील आष्टीचे आमदार सुरेश धस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला गेले आहेत.. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे.
आष्टीचे आमदार सुरेश धस धनंजय मुंडे यांना या प्रकरणावरून नेहमी टार्गेट करत आहेत. आतापर्यंत त्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांची त्यांनी राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न चालवला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर जाऊन त्यांनी भेट घेतली आहे.त्यांच्यासोबत आमदार रत्नाकर गुट्टे सुद्धा आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर भाजप आमदार सुरेश धस , रत्नाकर गुट्टे तिघांची बैठक सुरु आहे. सुरेश धस अचानक अजित पवार यांच्या भेटीला पोहोचल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे.. या प्रकरणातील आरोपी तपासासाठी एसआयटी नेमण्यात आली हो.ती त्यातून एक पीएसआय हवालदार आणि अजून एकाला हटवण्यात आला आहे.. कारण पीएसआय चा वाल्मीकरांड सोबत सेलिब्रेशन करतानाचा फोटो समोर आला होता.. त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदापासून दूर व्हावे अशी विरोधी पक्षांची मागणी आहे.. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखीनच वाढणार आहेत..