राजमुद्रा : बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळ राज्यभरात संतापाच वातावरण निर्माण झाल आहे. या प्रकरणाशी मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव जोडले जात आहे..त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे..अशातच आता भाजपचे आमदार सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं. या भेटीनंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले , धनंजय मुंडे यांच्या राजीनामाची मागणी मी केलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रकाश सोळंके यांनी राजीनामाचे मागणी केली असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितलं.
आज अजित पवारांची भेट घेतल्यानंतर सुरेश धस यांनी असं म्हटलं की, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील गॅंगला मोका लावण्यात यावा अशी मागणी त्यांनी करत हे प्रकरण गंभीर असल्याची खंत ही व्यक्त केली.. बीड मधील काही पतसंस्था बुडाला यात वाल्मीक कराडचा संबंध आहे यात खाडे नावाचा पोलीस अधिकारी सहभाग असल्याने आढळून आला.. त्यावेळी त्याच्या घरी कॅश सापडली. वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे ने पैसे मिळवणाऱ्यांना पाठीशी घातला हे उघड असल्याचा आरोप हे धस यांनी केला आहे..
दरम्यान याआधी या हत्या प्रकरणामुळे पुण्यातील जुनाक्रोश मोर्चात आमदार सुरेश धस यांनी क्या हुआ तेरा वादा असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला होता. त्यानंतर आज त्यांनी भेट घेतल्याने धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होणार असल्यास वर्तवले जात आहे..