राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं होत . हा पराभव आता नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला असून आगामी मुंबई महापालिका निवडणुकांचे वेध सर्वांना लागले आहेत.. या मनपा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली असून यासाठी आता शिवसेना उद्धव ठाकरे गट ही सज्ज झाला आहे.. संपूर्ण तयारीने मैदानात उतरण्याची तयारी ठाकरे गटाने केली असून या निवडणुका स्वबळावर लढण्याची शिवसैनिकांची मागणी होत आहे. त्यामुळे आगामी मनपा निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार का?हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आता “मिशन मुंबई “वर केंद्रित केलं असून या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी गेल्या महिन्यात, 26 व 27 डिसेंबर रोजी मातोश्री येथे मुंबईतील 16 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला होता. तर त्यानंतरही त्यांनी 14 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. एवढंच नव्हे तर ते आज ( गुरूवार 9 जानेवारी) दक्षिण मुंबईतील 6 विधानसभा मतदारसंघांचाही आढावा घेणार आहेत.. या निवडणुकीत मुंबईवर आपली सत्ता राखून ठेवण्यासाठी ठाकरे गटाने जोरदार कंबर बसली आहे..
विधानसभा निवडणुकीचा पराभव मनावर न घेता आगामी मनपा निवडणुका स्वबळावर लढवावी अशी शिवसैनिकांची मागणी आहे असा अहवाल उद्धवसेनेच्या पक्ष निरीक्षकांनी पदाधिकाऱ्यांकडून घेतला आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी मातोश्री येथे विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, विधानसभा संघटक यांच्यासोबत बैठक घेऊन संघटनात्मक आढावा घेतला आहे. या बैठकीत अनेक पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा सूर उमटवला असल्याची माहिती समोर आली आहे..
मनपा निवडणूक लढवण्यासाठी कोणासोबत ही युती किंवा आघाडी न करता स्वबळावर ही निवडणूक लढवावी अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे.. त्यामुळे मनपा निवडणुकीत ठाकरे गट बाजी मारणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.