राजमुद्रा : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंचं तापलं आहे. या प्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मीक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.. आता आपलं मंत्री पद वाचवण्यासाठी मंत्रिमंडळ यांच्याकडून जोरदार फिल्डिंग लावली जात असून त्यांनी वरिष्ठासोबतच्या भेटीगाठी वाढवल्या आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच प्रफुल्ल पटेल यांचीही भेट घेतली.. भेटीनंतर त्यांनी राजीनामा दिले असल्याच्या चर्चांना उधाण आलं. मंत्रीपद वाचवण्यात धनंजय मुंडे यांना यश मिळणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे.
गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे भाजपचे आमदार सुरेश धस, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या नेत्यांकडून सातत्याने धनंजय मुंडेंवर आरोप केले जात आहे. आता धनंजय मुंडेंकडून मंत्रिपद वाचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर धनंजय मुंडे यांनी काल प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली होती. तर आज त्यांनी सुनील तटकरेंसोबत फोनवरुन चर्चा केली. यावेळी त्यांनी सध्या घडत असलेल्या विविध प्रकरणांवर भाष्य केले आहे.
या प्रकरणातील मुख्य तीन आरोपींपैकी दोन आरोपी पोलीस कोठडीत आहेत. तर एक जण फरार आहे. तसेच दुसरीकडे खंडणीप्रकरणी अटकेत असलेला वाल्मिक कराड हा या हत्येमागचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप होत आहे.हा मुंडे यांचा निकटवर्ती असल्याने त्यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत चालला आहे.
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. यानंतर काल संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संतोष देशमुख यांच्या पत्नीला मस्साजोग गावापासून जवळ असलेल्या लातूरमध्ये नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे..