राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. निकष बदलावरून ही योजना चर्चेत आली असतानाच आता बीडमध्ये नवीन वाद भेटणार आहे… बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील तर मास्टरमाईड वाल्मीक कराड हा लाडकी बहीण योजना समितीचा अध्यक्ष असल्याची माहिती समोर आली आहे.. या प्रकरणात इतकं सगळं घडूनही वाल्मीक कराड अजूनही अध्यक्ष पदावर कसा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वाल्मीक कराड याच्यावर 14 गुन्हे असतानाही या लाडक्या बहिणी योजनेचे पद बहाल त्याला करण्यात आलं. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आता वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या बीड प्रकरणातील वाल्मीक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकडवर्तीय असल्याने त्यांच्या राजीनामेची एकीकडे मागणी होत आहे तर दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे यांनीच या पदासाठी त्याच्या नावाची शिफारस केली असल्याची माहिती समोर आली आहे.. पालक मंत्री असताना त्यांनी समितीच्या अध्यक्षपदी वाल्मीक कराडची शिफारस केली होती.. मात्र त्याच्यावर गुन्हे दाखल होऊनही त्याला या योजनेचे पद बहाल करण्यात आले. त्यामुळे आता मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कराड हा परळी येथील लाडकी बहीण योजना समितीच्या पदावर अजूनही कायम आहे.
त्यामुळे बीडमध्ये अजून एक नवीन वाद पेटणार आहे.
सध्या वाल्मीक कराड हा नऊ दिवसापासून सीआयडीच्या कोठडीत आहे. दरम्यान आता त्याची तब्येत बिघडली असल्याची माहिती समोर आली आहे..CID कडून आज त्याची व्हॉईस सॅम्पल घेण्याची शक्यता आहे. व्हाईस सॅम्पल जुळल्या नंतर वाल्मीक कराड याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.