जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | दि. ५ व ६ जुलै दरम्यान अखिल भारतीय बुध्दीबळ संघटनेतर्फे ऑनलाइन पध्दतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलींच्या गटात जळगावच्या सानिया रफिक तडवी हिने ९ पैकी ७ गुण मिळवित पाचवा क्रमांक मिळवला .
अंत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत क्रमांक २ ते क्रमांक ६ अशा एकूण ५ मुलींचे समान ७ गुण झाले, त्यामुळे सरस टायब्रेकच्या आधारे गुणानुक्रम निश्चित करण्यात आला व सानिया ला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले .
सानियाच्या यशाबद्दल जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हा बुध्दीबळ संघटनेचे अध्यक्ष अतूल जैन, सचिव नंदलाल गादिया यांनी कौतुक केले असून यापुढील आशियाई शालेय बुध्दीबळ स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.