राजमुद्रा : लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच बिगुल लवकरच वाजणार आहे.. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाली असताना आता महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत संघटनात्मक घडी विस्कटू नये याची खबरदारी भाजप घेत असल्याची माहिती समोर आली आहे.. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपा प्रदेशाध्यक्ष पदाचा फैसला लांबणीवर पडणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चंद्रशेखर बावनकुळेचं यांच्या खांद्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा राहणार आहे.
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा फैसला दरवेळी पुढे ढकलण्यात येत आहे. यापूर्वी लोकसभा निवडणूक, विविध राज्यातील निवडणुका, या प्रत्येकवेळी जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ पुढे ढकलण्यात आला. त्यांचा उत्तराधिकारी अजून मिळालेला नसताना आता सात राज्यातील भाजपा अध्यक्ष बदलण्याची चर्चा सुरू आहे. त्यात महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.. या अगोदर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पद चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे होते. मात्र त्यांना आता राज्य मंत्रिमंडळात समावेश होऊन महत्त्वाचे महसूल खाते देण्यात आले.. त्यांच्याकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद तुर्तास कायम ठेवण्याचा निर्णय वरिष्ठांनी घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपा सरकार सत्तेत आले आहे. भाजपाचे प्रदेश महाअधिवेशन येत्या रविवारी , 12 जानेवारी रोजी शिर्डी होत आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा मार्गदर्शन करतील. नड्डा यांच्याकडे केंद्रीय मंत्रिमंडळात आरोग्य मंत्री पदाचा कारभार आहे. सात महिन्यांपासून ते मंत्रीपदासह भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कारभार पाहत आहेत. बावनकुळे यांचा कार्यकाळ ऑगस्ट 2025 पर्यंत आहे. तर आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी ही जबाबदारी त्यांच्यावर कायम असावी, असे वरिष्ठ नेत्यांची भावना असल्याचे समोर येत आहे.