राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयानंतर आता भाजपने आगामी मनपा निवडणुकीसाठी मोठा मास्टर प्लॅन तयार केला असून लवकरच भाजप रणशिगं फुकणार आहे.भाजपच्या महाविजय 3.0 अभियानास उद्यापासून सुरुवात होणार आहे. शिर्डीत रविवारी एक दिवसीय अधिवेशन होणार असून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये दणदणीत विजय मिळवू हे लक्ष रविवारी भाजपच्या राज्य अधिवेशनात निश्चित केला जाणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उद्या अधिवेशनाच्या पहिल्या सत्राची सुरुवात करणार आहेत तसेच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी.नड्डा हे निवडणुकीसाठी सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. पहिल्या सत्राचा समारोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या भाषणाने होईल. तर दुसऱ्या सत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यकर्त्यांना कानमंत्र देतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भाषणाने अधिवेशनाचा समारोप होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक संदर्भात महाविजय 3.0 ची घोषणा केली जाईल. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी रणनिती आखली जाणार आहे.
दरम्यान या अभियानाच्या पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज भाजपचे सर्व जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. तर दुसऱ्या बैठकीत फडणवीस हे भाजपच्या सर्व आमदार व मंत्र्यांसोबत संवाद करणार आहेत..यामध्ये त्यांच्याकडून आगामी निवडणुका संदर्भात मोठी रणनीती आखली जाणार आहे..