राजमुद्रा : राज्यातील लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर आता महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे.. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या परभवानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला ठाकरे गट आता जोमाने मैदानात उतरला आहे..शिवसेना ठाकरे गट आता सर्व महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा संजय राऊत यांनी केली आहे.
सध्या राज्यातील सर्वच राजकीय पक्षांकडून महापालिकेच्या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे.. त्यातच आता ठाकरे गटाकडून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्व बाळाचा नारा देण्यात आला आहे. निवडणुकीत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईपासून ते नागपूरपर्यंत प्रत्येक महानगरपालिका ही स्वबळावर लढणार आणि कार्यकर्त्यांना बळ देणार असं स्पष्ट सांगितला आहे. या निवडणुकीत काय होईल ते होईल पण आम्हाला आमचं नशीब आजमावायाचं आहे,,असेही त्यांनी ठामपणे सांगितले आहे..
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाची महत्वाची बैठक उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी घेतली होती. या बैठकीत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. तसेच काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे संकेत दिले होते. अखेर आज ठाकरे गटात्या वतीने संजय राऊतांनी ही घोषणा केली. त्यामुळे या मनपा निवडणुकीत ठाकरे गटाच नशीब चमकणार का आहे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे..