राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा झालेला पराभव नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता असल्याने आता आघाडीकडून महायुतीत पक्षांतराचा ओढा वाढत चालला आहे.. या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटापाटोपाठ काँग्रेस सह राष्ट्रवादी शरद पवार गटाला ही मोठा धक्का बसला आहे.. काँग्रेसचे माजी नगरसेवक जॉय कांबळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका सुषमा पगारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला आहे.. त्यामुळे महाविकास आघाडीला नाशिकमध्ये मोठे खिंडार पडला आहे..
आगामी मनपा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मधुकर जाधव यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे माजी नगरसेवक समीर कांबळे आणि राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका सुषमा पगारे यांनी शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करीत धनुष्यबाण हाती घेतले. त्यामुळे महाविकास आघाडीसमोर आपला पक्ष एकसंध ठेवण्याचं मोठं आव्हान उभं राहील आहे.
ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मधुकर जाधव, तसेच मनसेचे बाजीराव दातीर यांचा शिंदे गटात प्रवेश झाला. त्यानंतर आता काँग्रेसची दीर्घ परंपरा लाभलेले समीर कांबळे आणि नाशिक पूर्व विभागातील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका सुषमा पगारे, रवी पगारे यांनी मुंबईत शिंदे गटात प्रवेश केला. पक्षाचे मुख्य नेते शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेश सोहळ्याप्रसंगी सचिव तथा खासदार नरेश म्हस्के, उपनेते तथा जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, विजय करंजकर, सहसंपर्कप्रमुख चंद्रकांत लवटे, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, योगेश म्हस्के, संजय तुंगार आदी उपस्थित होते.
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला घवघवीत यश मिळाले असून, शिंदे गटाकडे शहरविकासाचे नगरविकास हे महत्त्वाचे खाते आले आहे. त्यामुळे शिंदे गटाकडे येणाऱ्यांचा ओढा आता वाढत चालला आहे.