राजमुद्रा : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याच लोकेशन सापडल असल्याची चर्चा रंगली आहे.. त्यामुळे पोलीस यंत्रणा आता सतर्क झाली असून तो नाशिकमध्ये असल्याची माहिती सोशल मीडियातून समोर आली आहे.. पोलिसांकडून त्याचा तपास सुरू करण्यात आला असून त्यांना यश येणार का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे..
गेल्या काही दिवसांपूर्वीच या प्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मीक कराड हा पोलिसांना शरण आला. तर इतर आरोपींना पुण्यातूनच अटक करण्यात आली. पण कृष्णा अद्यापही फरार आहे. त्याचा शोध पोलिसांकडून सुरू असून नाशिक उपनगर पोलिसांनी रात्री सर्च ऑपरेशन करून त्याची माहिती घेतली आहे.. कृष्णा आंधळेचें सोशल मीडियावर फिरणारे फोटो नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले हे पण अद्याप त्याचा तपास सुरूच आहे..
दरम्यान या हत्या प्रकरणात अटकेत असलेला मुख्य आरोपी विष्णू चाटेची रवानगी न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आल्यानंतर 18 जानेवारी पर्यंत ही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.. दरम्यान विष्णू साठेची रवांनगी लातूर कारागृहात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.