राजमुद्रा : बीड मधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला एक महिना पेक्षा जास्त कालावधी उलटला आहे.. या हत्या प्रकरणातील रोज नवनवीन खुलासे होत असताना आता मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची भेट घेतली..या भेटीनंतर त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही आरोप केले आहेत.. ते स्वतःला सिद्ध करू पाहत आहेत मी सरकार पेक्षा भारी आहे.. मात्र आता मुख्यमंत्र्यांनी ऍक्टिव्ह व्हायला हवं.. मुख्यमंत्र्यांना चॅलेंज करता म्हणजे धनंजय मुंडे हे सरकार पेक्षा कायद्यापेक्षा मोठे झाले का? असा सवालच त्यांनी उपस्थित केला आहे..
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्टरमाईड वाल्मीक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्याने ते चांगलेच निशाण्यावर आले आहेत..यावरून त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल आणि आरोप होत असताना आता धनंजय देशमुख हे न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.न्याय घेण्यासाठी त्यांची तळमळ आहे. धनंजय मुंडेंच्या टोळीने त्यांचे पोट भरलं नाही. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता मनावर घेणे गरजेचे आहे..त्यांच्या डोळ्यादेखत सरकार मधल्या मंत्र्यांकडून अशा घटना होणार असल्या तर सरकार म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणूनही लाजराने गोष्ट असल्याची खंत त्यांनी व्यक्त केले आहे..
या बीड हत्या प्रकरणातील काही आरोपींना अटक करण्यात आला असून उद्या काही आरोपी मोकट फिरत आहेत.. या प्रकरणावरून राज्यभरात संतापाच वातावरण निर्माण झाला आहे.. . तुम्ही खून करता आणि सरकारमध्ये राहून सरकारला चॅलेंज करता. मुख्यमंत्र्यांना चॅलेंज करता म्हणजे धनंजय मुंडे सरकारपेक्षा कायद्यापेक्षा मोठे झाले का?” असा सवाल मनोज जरांगेंनी केला आहे.