राजमुद्रा : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.. कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्री प्रकरणामुळे ‘आप’चे संयोजक तथा माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं टेन्शन वाढल आहे.. गृह मंत्रालयाने मोठी पाऊले उचलत या प्रकरणी ईडीला खटला चालवण्यास परवानगी दिली आहे.. त्यामुळे हे प्रकरण आता केजरीवाल यांना चांगलंच भोवणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
गेल्या काही महिन्यातच ईडीनं दिल्लीच्या नायब राज्यपालांना पत्र लिहित माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे कथित दारू घोटाळ्यातील ‘मुख्य सूत्रधार’ असल्याचं म्हटलं होतं. या पत्रानंतर नायब राज्यपाल विजय कुमार सक्सेना यांनी केजरीवाल यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करत त्यांच्यासह इतरांविरुद्ध ईडीनं दाखल केलेलं आरोपपत्र बेकायदेशीर असल्याच म्हटलं होते. तेव्हापासून अरविंद केजरीवाल यांच्यावर खटला चालविण्याची प्रक्रिया न्यायालयीन खटल्यांमुळे प्रलंबित राहिली होती. मात्र आता गृहमंत्रालयाने त्यांना खटला चालवण्यास परवानगी दिला असून अरविंद केजरोल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयानं दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मनी लाँड्रिंगमधील कथित सहभागासाठी मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) खटला चालवण्यासाठी ईडीला परवानगी दिली आहे. त्यामुळं केजरीवाल यांचं टेन्शन चांगलंच वाढला आहे..