राजमुद्रा : देशातील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यासाठी केंद्र सरकारकडून वर्षातून दोनदा डीए वाढ केली जाते.. या पार्श्वभूमीवरच आता केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना ग्रीन सिग्नल मिळाला आहे. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी 8 व्या वेतन आयोगास मंजुरी दिली असून 8 व्या वेतना आयोगाची स्थापन करण्यात आल्याची घोषणाच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. त्यामुळे लवकरच वेतन आयोग लागू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ होणार आहे.
याआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार पगार मिळत होता. 2014 मध्ये सातव्या वेतन आयोगाची घोषणा झाली होती त्यानंतर तो 2016 मध्ये लागू करण्यात आला होता.दरम्यान केंद्र सरकारकडून वेतन आयोगासंदर्भात नवा विचार केला जात असल्याची चर्चा होती. 8 व्या वेतना आयोगाऐवजी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि वेतनासंदर्भात नव्या मेकॅनिझमबाबत विचार केला जात आहे. मात्र आता केंद्र सरकारकडूनच आठव्या वेतन आयोगाला अखेर मंजुरी मिळाले आहे.. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या आयोगाला मंजुरी देण्यात आले आहे..
केंद्र सरकारने आत्तापर्यंत 1847 पासून आत्तापर्यंत 7 वेतन आयोगाला केंद्र सरकारीने मंजुरी दिली होती. आता, 8 व्या वेतना आयोगालाही केंद्र सरकारने मंजुरी दिल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली. केंद्र सरकारच्या सर्वच कर्मचाऱ्यांसाठी सरकारने 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी देण्यात आली आहे.