राजमुद्रा : आगामी दिल्ली विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेवल्या असताना आता सर्व राजकीय पक्षानीं जोरदार मोर्चे बांधणी केली आहे.. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे.. या यादीमध्ये 20 नावांचा समावेश करण्यात आला आहे..यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, पार्थ पवार, सुनील तटकरे यांच्यासह अनेक दिग्गज नावांचा समावेश आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर अजितदादांच्या राष्ट्रवादीने जोरदार कंबर कसली आहे.. त्यांनी जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांमध्ये अजित पवार, पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, ब्रीज मोहन श्रीवास्तव, सुबोध मोहिते, अविनाश अदिक, संजय प्रजापती, उमाशंकर यादव, धीरज शर्मा, चैतन्य मानकर, विरेंद्र सिंग, दिपाली अरोरा यांच्यासह आणखी काही नेत्यांचा समावेश आहे.
या निवडणुकीसाठी उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. 18 जानेवारीला उमेदवारांच्या अर्जाची छाननी होणार आहे. उमेदवाराला वीस जानेवारीपर्यंत आपला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. तर पाच फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, आठ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे.दरम्यान या निवडणुकीत आप आणि भाजप यांच्यात काटे की टक्कर होणार आहे..त्यामुळे भाजप अरविंद केजरीवाल यांना धक्का देऊन सत्ता स्थापन करणार की, पुन्हा एकदा दिल्लीमध्ये आपचीच सत्ता येणार? हे पाहाणं महत्त्वांच ठरणार आहे.