राजमुद्रा : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.. या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटी करीत आहेत.. आता या प्रकरणाला चांगलाच वेग आला असून ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम याची सरकारी वकील म्हणून नेमणूक करावी अशी मागणी होत आहे.. या पार्श्वभूमीवर निकम यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली.. देशमुख हत्या प्रकरणाचे वकील पत्र घेण्याबाबत निकम – फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे..
सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि हे प्रकरण लावून देणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी या या तपासात सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नेमणूक करावी अशी मागणी केली आहे..
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे,महेश केदार, विष्णू चाटे,प्रतीक घुले आणि सिद्धार्थ सोनवणे यांना अटक करून त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.. दरम्यान या प्रकरणातील कृष्णा आधंळे हा फरार असून त्याचा शोध बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या तिन्ही पथकांकडून घेतला जात आहे.. या प्रकरणातील मास्टर माइंड वाल्मीक कराड यालाही खंडणीप्रकरणी अटक करण्यात आली असून त्याच्यावर मोकांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.. आता या प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून ज्येष्ठ उज्वल निकम यांनी वकीलपत्र घ्यावे अशी मागणी केली जात आहे..