राजमुद्रा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराज झालेले माजी मंत्री छगन भुजबळ हे आता उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत निवडणुकीचे रणशिगं फुंकणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत आहेत.. अशातच आजपासून दोन दिवस होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनाला छगन भुजबळ हजेरी लावणार आहेत. त्यामुळे नाराजी नाट्यानंतर आज पहिल्यांदा छगन भुजबळ आणि अजित पवार हे आमने- सामने येणार आहेत.. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत ते निवडणूक रणशिंग फुंकणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे..
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक निकालाच्या पराभवानंतर आता आघाडीतील सर्वच नेते कामाला लागले आहेत..आगामी महापालिका, नगरपरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे. दरम्यान आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नवसंकल्प अधिवेशनला नाराज असलेले छगन भुजबळ हजर राहणार आहेत. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या विनंतीवरुन आज ते शिबिराला उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच आजपासून शिर्डीत दोन दिवसीय अधिवेशन सुरू होत आहे.. त्या अधिवेशनाच्या ठिकाणास यशवंतराव चव्हाण नगरी म्हणून संबोधित करण्यात आले आहे. या अधिवेशनाला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल, मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादीचे मंत्री, आजी माजी आमदार, खासदार आणि महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.