राजमुद्रा : आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत.. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या आघाडीतील नाराज नेत्यांना सोबत घेण्याच्या शिवसेना शिंदे गटाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.गेल्या काही महिन्यात ठाकरे गटातील अनेक नेते, कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे . त्यामुळे ठाकरे गटाला मोठं खिंडार पडला असताना आता जळगाव मध्येही ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसणार आहे.जळगाव महापालिकेचे ठाकरे गटातील माजी नगरसेवक शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
आगामी स्थानीक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव मध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.. ठाकरे गटातील नाराज नेते आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत.. अशातच जळगाव महापालिकेतील शिवसेना ठाकरे गटाचे चार ते पाच माजी नगरसेवक हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे..
आगामी मनपा निवडणुका तोंडावर आले असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 1 फेब्रुवारीला जळगाव दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात मनपातील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा निवडणूक लढलेले तसेच ठाकरे गटाचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या सुद्धा नावाची चर्चा होत आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या आधीच ठाकरे गटाला खिंडार पडणार आहे.