राजमुद्रा : दिल्ली विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाच आम आदमी पक्षाला मोठं खिंडार पडल आहे.. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीतील सात आमदारांनी एकाच वेळी प्राथमिक सदस्यात्वाचा राजीनामा दिला आहे.. त्यामुळे सत्ता टिकवण्याच आव्हान अरविंद केजरीवाल्यांसमोर असताना दिल्लीत मोठा राजकीय भूकंप झाला आहे.
दिल्लीत 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून 8 फेब्रुवारीला निकाल जाहीर केला जाणार आहे.. या मतदानाला पाच दिवस शिल्लक असताना त्रिलोकपुरीचे आमदार रोहित महरौलिया, जनकपुरीचे आमदार राजेश ऋषी, कस्तूरबा नगरचे मदनलाल, पालमी सीटचे आमदार भावना गौड, बिजवासनचे बीएस जून, आदर्शनगरचे पवन शर्मा, मादीपूरचे गिरीश सोनी आणि महरौलीचे नरेश यादव यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे.. या निवडणुकीत या सर्व आमदारांचं तिकीट कापण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांच्यात नाराजी होती.. आता हीच नाराजी आता निवडणुकीआधीच दिसून आली आहे.
आपल्या राजीनामाच्या पत्रात आमदारांनी आम आदमी पक्षाची स्थापना प्रामाणिक विचारसरणीच्या पायावर झाली होती.. पण आता या विचारधारेपासून पक्ष पूर्णपणे भरकटला आहे असेही नमूद करत अरविंद केजरीवाल यांना चांगलंच सुनावल आहे.. त्यामुळे ऐन निवडणुकीआधीच अरविंद केजरीवाल यांना मोठा झटका बसला आहे..