राजमुद्रा : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे.. त्यांच्याकडून या अर्थसंकल्पामध्ये अनेक निर्णय जाहीर करण्यात आले आहेत…कृषी क्षेत्र, उद्योग, शिक्षण आरोग्य अशा विविध क्षेत्रांसाठी काही महत्वाच्या मोठ्या घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत.
१०० जिल्ह्यांसाठी धनधान्य कृषी योजना
डाळींचे उत्पादन वाढवण्यासाठी आत्मनिर्भरता मिशन
डाळींचे उत्पादन वाढवण्यासाठी ६ वर्षांची योजना
खाद्य क्षेत्रात आत्मनिर्भरता वाढवणार
ग्रामीण महिला, शेतकऱ्यांच्या विकासासाठी विशेष योजना
राज्यांच्या मदतीने कृषी क्षेत्रात विकास घडवणार
या अर्थसंकल्पातून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विविध क्षेत्रासाठी भरभरून आर्थिक तरतूद केली आहे.. तसेच नव्या योजनांची घोषणा देखील केली आहे.. नोकरदार वर्गासह साऱ्यांच लक्ष टॅक्स सेल सॅलबकडे लक्ष होतं अर्थमंत्र्यांनी 12 लाखापर्यंत उत्पन्न हे करमुक्त असल्याचे जाहीर करत दिलासा दिला आहे.. जाणून घेऊया या अर्थसंकल्पात काय स्वस्त आणि काय महाग?
2025-26 च्या अर्थसंकल्पात काय स्वस्त?
– LED-LCD च्या किंमती कमी होणार
– टीव्हीचे पार्ट्स स्वस्त होणार
– मोबाईल स्वस्त होणार
– मोबाईलच्या बॅटरीसंदर्भातील 20 भांडवली वस्तूंना सूट
– कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी 56 औषधं कस्टम ड्युटी फ्री
– लिथियम बॅटरीत लागणारी कोबाल्ट पावडर
– भारतात तयार होणार कपडे स्वस्त होणार
– चामड्यांपासून बनवलेल्या वस्तू स्वस्त होणार
– गोठवलेल्या माशांच्या पेस्टवरील मूलभूत सीमाशुल्क 30% वरून 5% पर्यंत कमी करणार
2025-26 च्या अर्थसंकल्पात महाग काय?
– इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनेल डिस्प्लेवरील सीमाशुल्कात वाढ
– फॅबरिक (Knitted Fabrics)
– बऱ्याच आवश्यक वस्तूंवर सीमाशुल्क कमी किंवा सूट दिली जाणार आहे. परंतु काही वस्तू महाग होणार आहेत, विशेषतः तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रात.