राजमुद्रा : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला.. या अर्थसंकल्पावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. एकविसाव्या शतकातील हा अर्थसंकल्प विकसित भारताचा अर्थसंकल्प असून भारताला गतीने पुढे नेणार आहे असं त्यांनी म्हटले आहे.. तसेच त्यांनी यावेळी बोलताना त्यांनी शेतकरी, युवा वर्ग आणि इन्फ्रास्ट्रक्चरबाबत माहिती दिली आहे.
या अर्थसंकल्पात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मध्यमवर्गांकरिता ड्रीम बजेट दिलेल आहे.. तसेच इन्कम टॅक्सची मर्यादा त्यांनी सात लाखावरून आता बारा लाखापर्यंत नेली आहे..त्यामुळे आता१२ लाख उत्पन्न असणाऱ्या लोकांना कोणताही भरावा लागणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे. याचा फायदा मध्यमवर्गीय आणि तरुणांना होणार आहे असेही त्यांनी सांगितलं.. तसेच शेतकऱ्यांना अधिक पैसे मिळण्यासाठी तेलबियांच्या बाबत देखील निर्णय घेतला गेला आहे..दरम्यान डिजपोजेबल इन्कन मध्यमवर्गीयांच्या खिशामध्ये येणार आहे. त्यामुळे जे इन्कम आहे ते खर्च केल्याने मागणी वाढणार आहे, ज्याचा देशाच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोगाला होणार आहे. त्यामधून रोजगार निर्मिती होणार आहे. अतिशय धीराने निर्णय घेतलेला हा निर्णय मैलाचा दगड ठरेल असे त्यांनी म्हटले आहे.. या अर्थसंकल्पावरून बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनाही चांगलच सुनावल आहे.. मागच्यावेळी विरोधकांनी आरोप केले होते.. या राज्याला काही दिलं नाही पण मी मागच्या वेळेप्रमाणे यावेळी देखील काय काय राज्याला मिळालं याचीही मी आकडेवारी देईन असेही त्यांनी सांगितल आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली होती.. त्यांनी आज अर्थसंकल्प सादर करून विक्रम केला आहे.. या अर्थसंकल्पात त्यांनी मोठमोठ्या घोषणा देखील केल्या आहेत..