राजमुद्रा : गेल्या काही दिवसांपासून महायुतीत नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदावरून जोरदार वाद सुरू आहे.. यापूर्वी रायगडच्या पालकमंत्रीपदी आदिती तटकरे आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती.. मात्र एका दिवसात सरकारला नियुक्तीला स्थगिती द्यावी लागली होती सरकारने दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देऊन दोन आठवडे उलटले तरी पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही.. त्यामुळे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या असताना आता अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलेल्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे.
महायुतीतील रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून बोलताना या दोन्ही जिल्ह्याचा तिढा लवकरच मिळेल असं वक्तव्य तटकरे यांनी केल आहे त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.. तसेच या दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून असलेला तिढा यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच निर्णय घेतील असेही त्यांनी स्पष्ट सांगितला आहे..त्यामुळे हा तिढा लवकर सुटेल की आणखी वाढेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
गेल्या काही दिवसापासून महायुतीत पालकमंत्री पदावरून असलेल्या वादावर विरोधकांकडून जोरदार टीका होत होती.. या टीकेला आता अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उत्तर देत टोला लगावला आहे.. याबाबत बोलताना ते म्हणाले, दगड फक्त फळ येणाऱ्या झाडालाच मारला जातो… आमच्या पक्षाकडून कोणतीही टीका टिपणी करण्यात आलेली नाही असे त्यांनी स्पष्ट सांगितलं. आता महायुतीतील रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार की वाढणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत .