राजमुद्रा : बीड मधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं या प्रकरणाला आता दोन महिने उलटत आले आहेत..सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही हे प्रकरण लावून धरलं असून याबाबत त्यांनी एक ट्विट केल आहे.. उद्या सकाळी 11 वाजता त्या पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेतून त्या काय गौप्यस्फोट करणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे.
बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणांमध्ये राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा हात असल्याचा आरोप विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील काही जणांनी केले आहेत. त्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा ही घ्यावा असा मागणीने जोर धरला होता.. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही जोर लावला होता.त्यानंतर तरी भ्रष्टाचाराचे पुरावे पाहून मंत्रिपदाचा राजीनामा मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. उद्या होणाऱ्या पत्रकार परिषदेतून त्या कोणता मुद्दा मांडणार की धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार का? असं सवाल उपस्थित केला जात आहे.. यादरम्यान त्यांनी असे म्हटले आहे की या प्रकरणातील हे सगळे पुरावे अतिशय धक्कादायक आहेत, ते उद्या जनतेपुढे येतील, त्यानंतर नक्कीच मोठा निर्णय घ्यायला जनता सरकारला भाग पाडेल, असा विश्वास अजंली दमानिया यांनी व्यक्त केला.
याबाबत बोलताना त्यानीं असेही म्हटले आहेत की, उद्याच्या पत्रकार परिषदेतून माझ्याकडून मोठे खुलासे होणार आहेत कि.,,ते पुरावे दाखवल्यानंतर मुख्यमंत्री काय किंवा अजित पवार काय, कोणीही त्यांची (धनंजय मुंडे) पाठराखण करू शकतील असं वाटत नाही, असा इशारा दमानिया यांनी दिला. त्यामुळे उद्याच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांच्या नजरा लागून राहिले आहेत..
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे सध्या बीडच राजकारण ढवळून निघालं.. या प्रकरणातील मंत्री धनंजय मुंडे यांचा वाल्मीक कराड असल्याने मुंडेंचा यात संबंध जोडला गेला आहे.. जोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत देशमुख कुटुंबियांना न्याय मिळेल असं वाटत नसल्याचं दमानिया यांनी वारंवार स्पष्ट केलं. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार का?हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे..