राजमुद्रा : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पावर विरोधकांकडून टिकेची जोड उठवण्यात आली होती.. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना मधून अर्थसंकल्पावर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आला आहे. आपल्या देशावर कर्जाचा फार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे व देश चालवण्यासाठी नवी कर्ज घेण्याचा सपाटा या सरकारने सुरू केला आहे.. त्यामुळं मध्यमवर्गीयांच्या कत्तलिला लवकरच सुरुवात होणार आहे..हा आमचा दावा नसून मोदी सरकारची पावले या दिशेने पडत असल्याचा स्पष्ट दिसून येत आहे… या अर्थसंकल्पामुळे महागाई आणि बेरोजगारी कमी होणार नाही. मग हा असला वांझ अर्थसंकल्प काय कामाचा? असं जोरदार टीकास्त्र सामनातून करण्यात आला आहे.
ठाकरेंच्या” सामना “मधून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावरही त्यांचा खडूस असा उल्लेख करून टीका करण्यात आली आहे.. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या भाजपच्या विजयाने मध्यमवर्गीय हे खुष नसून त्यांना खुश करण्यासाठी आता या अर्थसंकल्पातून 12 लाखाचे उत्पन्न करमुक्त केल्याचा फंडा आणलाय पण सुरीला मध लावून ती मध्यमवर्गीच्या मानावर फिरवण्याचा हा प्रकार असल्याच टीकास्रही करण्यात आला आहे..
देशात काळा पैसा आणि बनावट नोटांचा सूळसुळाट सुरू आहे त्यावर अर्थसंकल्पात कुठलाही तोडगा नाही.. वारंवार वाढत असलेली महागाई आणि बेरोजगारीमुळे लोकांकडे खर्च करायला पैसे नाहीत. त्यामुळे क्रयशक्ती वाढणार कशी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.. विधानसभा निवडणुका तोंडावर असताना लाडक्या बहिणींना आमिष दाखवून खुश केले जात असेल तर काय महिला वर्गाचा विकास म्हणायचा.. सामान्य कुवतीच्या महिलेने सामान्य बुद्धिमत्तेच्या सरकारसाठी तयार केलेल्या राजकीय बजेट आहे असा चिमटा देखील अग्रलेखातून काढण्यात आला आहे..
आज राज्यात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.. राज्यात नोकऱ्यांचा दुष्काळ पडला आहे..आंदोलनासाठी राज्यात बेरोजगार रस्त्यावर उतरला आहे व मोदींचे पोलीस त्यांच्यावर लाठीमार करीत आहेत. नोकऱ्या नाहीत त्यांनी पकोडे तळावेत असा मोदींचा मंत्र आहे.. असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर ही टीकास्त्र सोडला आहे.