पुणे राजमुद्रा वृत्तसेवा | राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर सध्या ईडीची कारवाई केली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या मागे ईडी लावली तर मी सीडी बाहेर काढेल असे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले होते. त्यामुळे मी आता एकनाथ खडसे सीडी कधी बाहेर काढतात याची वाट पाहत असल्याचे वक्तव्य राज ठाकरे यांनी पुण्यात केले.
मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असून यावेळी त्यांच्या हस्ते पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. एकनाथ खडसे ईडी ची सीडी लावणार म्हणाले होते. त्या सीडीची मी वाट पाहतोय असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला आहे. काँग्रेसचे सरकार होते तेव्हा ही असाच वापर करण्यात आला होता. भाजपाचे सरकार आल्यानंतर ते देखील वापर करत आहेत. ही काही तुमच्या हातातली बाहुली नाही. जिचा वापर तुम्हाला नको असलेला माणूस संपवण्यासाठी करायचा. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे असेही ते म्हणाले.