राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीतील भाजपच वरचढ पक्ष ठरला त्यानंतर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली.. तसंच उपमुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं.. यावरून आता शिवसेना ठाकरेचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडल आहे..मुख्यमंत्रिपद मिळालं नाही त्यामुळे एकनाथ शिंदे मनाने कोलमडलेत, असा टोला राऊतांनी लगावला आहे..
महायुती सरकार मध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री पद मिळावं यासाठी एकनाथ शिंदे धडपडत होते.. मात्र त्यांना या पदापासून डावलण्यात आलं..या धक्क्यातून एकनाथ शिंदे अजून सावरले नाहीत अशी टीका सामनाच्या रोखठोक मधून संजय राऊत यांनी केले आहे.. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात विसंवाद आहेत. आपल्या मारामारीत प्रशासन व जनतेचे किती हाल होते यांची त्यांना फिकीर नाही अशी टीका त्यांनी केली आहे..
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रोखठोकच्या माध्यमातून अनेक गौप्यस्फोट केले आहेत . इतकंच नव्हे तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा एका आमदाराने धक्कादायक माहिती दिल्याचंही संजय राऊतांनी सांगितलं.शिंदे हे स्वत:ला अपमानित केल्याच्या दु:खातून बाहेर पडायला तयार नाहीत. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात शिंदे आणि फडणवीसांची 2 दिशांना तोंड होती. आता फडणवीस त्याचे उट्टे काढतात. कारण शिंदेंच्या हातात काहीच राहिले नाही. एकनाथ शिंदे मनाने कोलमडलेत असा टोला त्यांनी लगावला.