राजमुद्रा : दिल्ली विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना काँग्रेस एक्शन मोडवर आला आहे.. या मतदानापूर्वी काँग्रेसने मोठी घोषणा केली आहे..काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ईगल पथक स्थापन केले आहे.. यात नियुक्त करण्यात आलेले सदस्य हे प्रथम महाराष्ट्राच्या निवडणुकीवर काम करणारे आहेत.. देशात होणाऱ्या निवडणुका मुक्ता आणि निपक्ष पद्धतीने होण्यासाठी काँग्रेसने हे मोठे पाऊल उचलले आहे..
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसने ‘ईगल’ (Empowered Action Group of Leaders and Experts) टीमची स्थापना केली आहे. निवडणुकीत पारदर्शकता यावी यासाठी ईगल च्या माध्यमातून देशातील निवडणुकीचे निकाल मतदार यादी यांचा अभ्यास करून त्यांचा अहवाल पक्षाच्या हायकमाड कडे सोपवला जाणार आहे . या टीमला पहिले काम हे महाराष्ट्रामधले देण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या मतदार यादीतील फेरफार याबद्दल कमिटी हायकमांडला रिपोर्ट सादर करणार आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आलेल्या काँग्रेसच्या या टीम मध्ये असलेल्यांचा सहभाग पुढील प्रमाणे –
1. अजय माकन
2. दीग्विजय सिंह
3. अभिषेक सिंघवी
4. प्रवीण चक्रवर्ती
5. पवन खेडा
6. गुरदीप सप्पल
7. नितीन राऊत
8. चल्ला रेड्डी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी (MVA) ला मोठा धक्का बसला, ज्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उत्तर प्रदेश) ने 20 जागा जिंकल्या, काँग्रेसने 16 जागा जिंकल्या आणि शरद पवार- राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) ने 16जागा जिंकल्या. फक्त 10 जागा मिळाल्या होत्या.