राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाला चांगलीच गळती लागली आहे.. या निवडणुकीत शिंदेंच्या विजयामुळे साहजिकच ठाकरेंची शिवसेना ही बॅकफूटवर आली आहे. गेल्या काही दिवसापासून शिंदेच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर ची तयारी सुरू करण्यात आली असून या अंतर्गत ठाकरेंचे आणि काँग्रेसचे काही नेते आपल्याकडे खेचून आणण्यात शिंदेसेना यशस्वी ठरली आहे.. आता पुन्हा एकदा ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार असून ठाकरेंचे 6 खासदार शिंदेच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे.. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.
राज्यात गेल्या दोन-तीन वर्षापासून मोठ्या राजकीय उलाढाली होत आहेत.. या अगोदर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारासह पक्ष सोडत भाजप सह सत्ता स्थापन केली.. त्यानंतर अजित पवारांनी ही काही आमदारासह सरकारमध्ये प्रवेश केला त्यामुळे राष्ट्रवादीतही फूट पडली.. यानंतर आता राज्यात आणखी भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात असून ठाकरे गटाचे सहा खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्वजण लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्यान उद्धव ठाकरे गटाला मोठे खिंडार पडणार आहे..
राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन झालं..सध्या राज्यात आणि केंद्रात भाजप सरकार आहे..त्यामुळे सत्ताधारी पक्षांच्या खासदाराला चांगला निधी मिळतो मात्र विरोधी पक्षाच्या खासदारांना विकासासाठी निधी कमी मिळतो अशी चर्चा आहे. त्यामुळे आपल्या मतदारसंघात विकास कामे करण्यासाठी हे खासदार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा वर्तवली जात आहे.दरम्यान आता .शिंदेंच्या शिवसेनेच ऑपरेशन टायगर सुरू असून या अंतर्गत आता ठाकरे गटाचे सहा खासदार संसदेच्या आगामी अधिवेशनापूर्वी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे..