धरणगाव राजमुद्रा वृत्तसेवा | राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री व भाजप अनुसूचित जाती प्रदेशाध्यक्ष आ. अशोक उईके व अँड किशोर काळकर, प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम यांनी धरणगाव भाजप कार्यालयास भेट दिली.
त्याप्रसंगी धरणगाव तालुकाच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. नेते मंडळींनी तालुका व शहर पदाधिकाऱ्यांशी पक्ष संघटनेविषयी चर्चा केली. त्यावेळी शिरिष बयास, ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड. संजय महाजन, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, शहराध्यक्ष दिलीप महाजन, गटनेते कैलास माळी, सुनील चौधरी, सरचिटणीस कन्हैया रायपूरकर, शरद भोई, विकास चव्हाण इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.