राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर शिंदेंची शिवसेना आता चांगलीच ऍक्टिव्ह मोडवर आली असून राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत आहे.. सध्या शिवसेनेच्या ऑपरेशन टायगर ची चर्चा राजकीय वरचा सूर असून या ऑपरेशन अंतर्गत ठाकरे गटाचे आणि काँग्रेसचे अनेक नेते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.. आता या ऑपरेशन टायगर वर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. शिंदे गट हा भाजपच्या पोटात उगवलेला ॲपेंडिक्स आहे. तो कधीही कापून टाकला जाईल, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे..
ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून शिंदे सेनेने आमचे सर्व खासदार फोडले जात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. मात्र आता ऑपरेशन टायर, ऑपरेशन कमळ होईल. पण आधीच ऑपरेशन रेडा झालेलं आहे. अशा अफवा पसरत आहेत. कालच आम्ही आमच्या कार्यालयाचे उद्घाटन केले. आमचे सर्व खासदार उपस्थित होते. ते आमच्या सोबतच आहेत.. ते कसलं ऑपरेशन करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रोज त्यांचं ऑपरेशन करतात. त्यांचा रोज अपमान होत आहे. शिंदे गट हा स्वतः भाजपच्या गोटातली उगवलेली अपेंडिक्स आहे ती कधी कापली जाईल सांगता येत नाही.. आमचं ऑपरेशन करण्यापेक्षा तुम्ही स्वतःची काळजी घ्या असा टोलाही त्यांनी लगावला.
आमचे सात खासदार शिंदेच्या गोतात असल्यास बोलले जात आहे.. मात्र आकडा चुकीचा सांगत आहेत. त्यांनी पैकीच्या पैकी खासदारांचा आकडा सांगायला हवा. ते कोणत्या गुंगीत आहेत, हे त्यांनी समजून घ्यायला हवं. त्यांनी त्यांची वैद्यकीय चाचणी पूर्ण केली पाहिजे. असा सणसणीत टोला त्यांनी त्यांना लगावला.