राजमुद्रा : गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते आणि महाराष्ट्राचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे बीड प्रकरणामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत.. त्यानंतर आता पुन्हा एकदा ते वादाच्या भोवऱ्यात अडकले असून घरगुती हिंसाचार प्रकरणात कौटुंबिक न्यायालयाने त्यांना दोषी ठरवला आहे. त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे.. वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने करुणा शर्मा मुंडे या त्यांच्या पहिल्या पत्नी असल्याचे मान्य केला असून त्यांना दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश यांना दिले आहेत..
करुणा शर्मा मुंडे यांनी 15 लाख रुपये महिना पोटगी मागितली होती पण न्यायालयांन धनंजय मुंडेंना महिन्यासाठी दोन लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.. त्यामुळे धनंजय मुंडे कौटुंबिक प्रकरणामुळेही चर्चेत आले आहेत.. यापूर्वी करुणा शर्मा यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते..निवडणूक काळात मला मारहाण करण्यात आली असं त्यांनी सांगितलं तसंच मी बीड सोडाव यासाठी मला वाल्मीक करांडन बेदम मारलं होतं असा खळबजनक आरोप देखील करुणा शर्मा यांनी केला आहे..वाल्मीक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा अतिशय निकटवर्ती असून तो सध्या सरपंच हत्या प्रकरणात तुरुंगात असल्याचा त्यांनी स्पष्ट सांगितलं..
या सर्व प्रकरणानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजलीया दमानिया यांनीही ट्विट केलं होतं,, त्या म्हणाल्या करुणा मुंडे या फॅमिली कोर्टात 4 फेब्रुवारी केस जिंकल्या त्याबद्दल एक स्त्री म्हणून त्यांचा अभिनंदन.. मी वैयक्तिक विषयावर बोलत नाही..ही वैयक्तिक टीका नाही याची नोंद घ्यावी..करुणा या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत त्यांना मारहाण झाली आणि त्याचा देखभाल खर्च देण्यात यावा आणि कुठल्याही प्रकारचे दुखापत करण्यात येऊ नये असे निर्देश आणि एक लाख 25 हजार रुपयांचा मासिक खर्च देण्यात यावा असे निर्देश कोर्टाने दिले असे अंजली दमानिया यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.. दरम्यान आता या कौटुंबिक प्रकरणामुळे दुसरीकडे ही त्यांच्या राजीनामाच्या मागणीने जोर धरला आहे.. त्यामुळे धनंजय मुंडे हे चांगलेच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.