राजमुद्रा : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनां मंत्रिमंडळ विस्तारात डावल्यामुळे त्यांनी थेट नाराजी व्यक्त केली होती.. त्यांना कोणतेही मंत्रिपद मिळाला नाही त्यामुळे त्यांनी स्पष्ट शब्दात आपली भूमिका मांडली होती.. त्यानंतर त्यांच्या नाराजीच्या चर्चांना अधिक जोर आला होता..आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी थेट छगन भुजबळ यांना फोन करून त्यांच्या नाराजीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांची नाराजी दूर झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे..
नुकतीच छगन भुजबळ यांनी एक पत्रकार परिषद घेत त्यांची नाराजी दूर झाल्याबद्दल भाष्य केले आहे..विशेष म्हणजे त्यांनी चार दिवसांपूर्वीच अजित पवारांचा फोन आला असं म्हणत उशिरा फोन करतोय म्हणून त्यांनी दिलगिरी व्यक्त करत.. यावर बोलू असं म्हटल्याचा सांगितलं. यानंतर आता स्वतः अजितदादांनीच फोन केल्याचे भुजबळ यांनी सांगितल्यामुळे त्यांची पुढील भूमिका काय असणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे.
छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळातील नाराजी वर भाष्य करत अजित दादांचा फोन बाबत खुलासा करताना काही महत्त्वाच्या विषयावरील लक्ष वेधल आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत नाशिक कुंभमेळा कांद्यावरील निर्यात बंदी आणि यासारख्या मुद्द्यावर चर्चा केली आहे..
छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळ मध्ये स्थान न मिळाले म्हणून ते वारंवार नाराजी व्यक्त करत होते.. अगोदर त्यांनी असही म्हटलं की, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे मला डावल काय आणि फेकलं काय कोणाला काय फरक पडतोय.. आयुष्यात मंत्री पद किती वेळ आला आणि किती वेळ गेला परंतु हा छगन भुजबळ संपला नाही.. असं म्हणत सातत्याने भूमिका मांडली होती.. आता त्यांच्या या नाराजीवर तोडगा निघाला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे..