राजमुद्रा : राजधानी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशभराचे लक्ष लागून राहिला आहे.. या निवडणुकीतील मतमोजणीचे सुरुवातीचे कल आता समोर येत असून सत्ताधारी आप आणि भाजपमध्ये काटे की टक्कर दिसून येत आहे.. या निवडणूक निकालामध्ये आप हे पिछाडीवर असून भाजपाने मोठी मुसंडी मारली असल्याचे दिसून येत आहे.. दिल्लीचे आजी-माजी मुख्यमंत्री सध्या पिछाडीवर आहेत.. यामध्ये विद्यमान मुख्यमंत्री अतिषी तसेच माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ही सुरुवातीपासूनच पिछाडीवर आहेत.. तर भाजपकडून अभिनेता गायक मनोज तिवारी, रोहिणी विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार आणि आमदार विजेंदर गुप्ता, दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे दिल्ली मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे..
5 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील 70 विधानसभा जागांसाठी मतदान पार पडलं असून आज मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहेत. दिल्लीत 60.54 टक्के मतदान झाले होते. 2020 च्या तुलनेत यावेळी दिल्लीत 2 टक्के कमी मतदान झाले. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि आम आदमी पक्ष (आप) यांच्यात अतिशय चुरशीची लढत दिसत आहे. सुरुवातीच्या निकालाच्या कलावरून दिल्लीत भाजपचाच कमळ फुलणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे..
दरम्यान 2020 च्या तुलनेत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 33 जागांचा फायदा झाला आहे..याच पार्श्वभूमीवर भाजपकडून दिल्लीत जल्लोषाला देखील सुरुवात झाली असून 27 वर्षानंतर भाजपा दिल्ली सत्तेवर येताना दिसत आहे. दरम्यान या अगोदर आपवर झालेले झालेले आरोप, मुख्यमंत्र्यांची तुरुंग वारी यामुळे दिल्लीकारांनी आपला नाकारला असल्याचे चित्र दिसून येत आहे..