राजमुद्रा : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजप मुसंडी मारताना दिसत असून आप पक्षाचा चांगलाच पराभव होताना दिसत आहे… या आप च्या पराभवावरून सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी “आप “वर चांगलाच निशाणा साधला आहे.. मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली सरकारमध्ये असताना दारू संदर्भात जे निर्णय घेतले ते चुकीचे होते..पक्ष हा जनतेच्या प्रश्नासाठी असतो स्वतःसाठी नसतो..ज्यावेळेस स्वार्थी राजकारण सुरू होता त्यावेळी माणूस संपतो असं म्हणत त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली आहे..
पुढे बोलताना ते म्हणाले, अरविंद केजवाल यांनी जनतेचा कौल आता मान्य केला पाहिजे.. मी सुरुवातीपासून पक्ष काढण्यास त्यांना विरोध केला होता.. समाजसेवा करत देशासाठी काम करण्याचा सल्लाही दिला होता मात्र त्यांनी तो नाकारला असल्यासही त्यांनी सांगितलं.. कोणत्याही उमेदवाराकडे स्वच्छ विचार, स्वच्छ चारित्र्य आणि त्यागाची भावना असायला हवी. या गुणांवरूनच मतदारांचा त्या उमेदवारावर विश्वास बसतो. मी हे अरविंद केजरीवाल यांनाही सांगितलं होतं. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. असं म्हणत त्याने त्यांच्यावर निशाणा साधला..
यंदाच्या निवडणुकीत भाजपने आपली सर्व ताकद पणाला लावली आहे..2013, 2015 आणि 2020 असं सलग तीन वेळा आम आदमी पक्षाने यश मिळवलं होतं आता दिल्लीत पुन्हा एकदा भाजपचे कमळ फुलताना दिसत आहे.. जवळपास 26 वर्षानंतर दिल्लीच्या सत्तेत भाजपची ताकद राहणार आहे..